Pune News : पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे शहर पोलीस दलातील हा पाचवा बळी गेला आहे.

पोलीस हवालदार विनोद पोतदार (51) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून पोतदार हे  पोलीस हवालदार वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

पोतदार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा (बीपी) त्रास होता. उपचार सुरु असतानाच काल त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि मूलगा असा परिवार आहे. पोतदार यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि कामाच्या पद्धतीने ते ओळखले जात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.