Pune News : लायन्स क्लबच्यावतीने एस.टी. कर्मचारी व प्रवाशांना मास्क वाटप

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंडस, लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या वतीने स्वारगेट एसटी डेपोच्या कर्मचारी व प्रवाशांना कोविड पासून सुरक्षेसाठी मास्कचे वाटप लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री, पुनीत कोठारी, अनील मंद्रुपकर, सुहास कुलकर्णी, रोहिणी नागवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुनिता चिटणीस, प्रीती दीक्षित , महादप्पा अंदुरे, पुनीत शर्मा, प्रमोद उमरदंड तसेच स्वारगेट डेपोचे अधिकारी उपस्थित होते.

अभय शास्त्री म्हणाले, कोविड साथीमुळे असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे एस्.टी. सेवा बंद होती. ती आता सुरू झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अशा वेळी असाधारण सेवा बजावणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील. प्रत्येकाने स्वतःसह एकमेकांची काळजी घेण्याने सुरक्षितता वाढेल.

सीमेवर सैन्य ज्या धैर्याने कामगिरी बजावते, त्याच धैर्याने प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

सेवाभावी उपक्रमातून लायन्स क्लब एस.टी. कर्मचाऱ्यांच्याकरिता कार्यरत राहील, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजक अनील मंद्रुपकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like