Pune News : पीएमपीएमएलला 110 कोटी रुपये देण्यास स्थायीची मान्यता – हेमंत रासने

संचलन तुटीच्या रकमेपैकी ३० कोटींचा पहिला हप्ता पीएमपीएमएलला दिला

एमपीएससी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेड (पीएमपीएमएल) ही स्वायत्त संस्था आहे. परंतु पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा संयुक्त उपक्रम असल्यामुळे 60 : 40 या प्रमाणानुसार प्रत्येकी 200 ते 250 कोटी रुपये संचलन तूट म्हणून द्यावे लागतात. त्यापैकी पीएमपीएमएलला 110 कोटी रुपये देण्यास तत्वत: मान्यता दिली असून त्यापैकी 30  कोटी रुपये आज दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मार्च 2021  पर्यंत टप्प्याटप्प्याने उर्वरीत रक्कम दिली जाईल. दरम्यान राज्यसरकारकडून लेखी पत्राद्वारे पुणे महापालिकेने पीएमपीएमएल ला देय रक्कम अदा करण्याचे सूचित केले आहे. त्यानंतर राज्यसरकार निधी महापालिकेला देईल, असे पत्रात स्पष्ट उल्लेख असल्याचे अध्यक्ष रासने यांनी सांगितले.

पीएमपीएमएलच्या थकित रकमेमध्ये एमएनजीएल गॅसचे 21 कोटी रुपये, वेतन, ग्रॅच्युईटी व अन्य बिलांची थकबाकी आहे.

तसेच कोविड सर्वेक्षणासाठी बस आणि कर्मचारी वापरले त्यांचे थकित 48 कोटी रुपये देणे आहे. मार्च 2021 पर्यंत उर्वरीत रक्कम पीएमपीएमएलला देण्यात येईल, असेही अध्यक्ष रासने यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.