Pune News : नदी संवर्धन प्रकल्पाच्या सल्लागार गट नियुक्तीला स्थायी समितीची मान्यता !

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पाअंतर्गत मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने निश्चित केलेल्या सल्लागारांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आज (मंगळवारी) मान्यता देण्यात आली. यामुळे मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.

शहरात प्रतिदिन 744 दशलक्ष लिटर एवढे सांडपाणी निर्माण होते. त्याअनुषंगाने प्रतिदिन 567 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी 10 सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे महापालिकेकडून उभारण्याचे नियोजित आहे. त्यासाठी महापालिकेने 990 कोटींचा आराखडा केला आहे.

या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालय (सध्याचे जलशक्ती मंत्रालयाकडून) मंजुरी मिळाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी 85 टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. उर्वरीत 15 टक्के रक्कम महापालिकेला खर्च करावी लागणार आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मे. पेल फ्रिशमन, लंडन युनायटेड किंगडम, एन जे. एस. इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. आणि एफ. पी इंडिया प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्सी सव्र्हिसेस या कंपन्यांच्या सल्लागार गट निश्चित केला आहे.

त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे या सल्लागारांच्या गटाला मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मान्य करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.