Pune News : एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पूल स्थलांतरित करण्यास स्थायी समितीची मान्यता

0

एमपीसी न्यूज – महामेट्रोच्या कामात अडथळा ठरणारा  एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पूल पडण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आता हा पूल सीओईपी हॉस्टेल समोर स्थलांतरीत होईल.

कर्वे रस्त्यावरील वाहतूक वाढली तशी नागरिकांना रस्ता क्रॉस करायला अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन कॉलेज ते कर्वे रस्ता पार करण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आला होता.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील पहिल्या काही पादचारी पुलांपैकी हा एक पूल होता. आता या ठिकाणी महामेट्रोचे काम सुरु झाले आहे. तसेच नळस्टॉप चौकात फ्लायओव्हर देखील बांधण्यात येणार आहे. या कामांना या पुलाची अडचण होत असल्याने हा पूल पाडण्यात येणार आहे.

प्रशासनाकडू ठेवण्यात आलेल्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. हा पूल आता महामेट्रो कडून काढून सीओईपी हॉस्टेल समोर स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment