Pune News : इंडस्ट्रीजमधील कर्मचाऱ्यांसाठी आवारातच स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करा : दीपाली धुमाळ

औद्योगिक कंपन्यांमधील कर्मचारी वर्ग कामानिमित्त बाहेर आल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि परिसरातील मोठ्या इंडस्ट्रीजमधील आवारातच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सोमवारी केली आहे.

पुणे शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने रूग्णांना वेळेत हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहे.

लॉकडाऊन उठल्याने सर्व छोटे मोठे उद्योगधंदे व्यवसाय सुरू झाले आहे. परिणामी औद्योगिक कंपन्यांमधील कर्मचारी वर्ग कामानिमित्त बाहेर आल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे.

काही ठराविक कर्मचारी असलेल्या कंपनीने आपल्या कोरोना बाधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी आपल्या कंपनीच्ये आवारातच विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, ऑक्सिजन बेड्स व व्हेंटीलेटर बेड्स असलेले व आवश्यक असलेला स्टाफ डॅ।क्टर्स, नर्सेस, टेक्निशन व हॉस्पिटल साठी लागणारा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून घ्यावा.

अशा प्रकारे ज्या कंपन्या हॊस्पिटलची व्यवस्था करतील त्या कंपन्यांना केंद्र शासन, राज्य शासन किंवा महानगरपालिका यांचे स्तरावरून विशेष सवलत व मदत करावी. या विषयी आपल्या अधिकारात आवाहन करून अध्यादेश काढावा, असेही दीपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, कामगार आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त यांनाही यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.