Pune News : पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी सुरू करा ; अन्यथा रस्ता मोकळा करा : नगरसेविका अश्विनी कदम

एमपीसी न्यूज : स्वारगेट ते कात्रज मार्गावर बीआरटी बससेवा सुरू करण्यासाठी 108 कोटी रुपये खर्च केले आहेत. एका बसटॉपसाठी 80 लाख खर्च केले आहेत. परंतु, स्वारगेट आणि कात्रज दोन्ही ठिकाणचे बसस्टॉप उभारलेच नसल्याची धक्कादायक कबुली पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बीआरटी बससेवा तातडीने सुरू करा; अन्यथा रस्ता मोकळा करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दक्षिण पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्याची इच्छाशक्ती नाही. स्मार्टसिटीच्या नावाखाली सातारा रस्त्यावरील बीआरटी आणि मेट्रो रखडली आहे.

सत्ताधाऱ्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक नाही. पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळे तातडीने बीआरटीसाठी तयार केलेल्या बससेवा सुरू करा; अन्यथा सर्व बसस्टॉप, बॅरिकेड तोडून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नगरसेविका कदम यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.