Pune News : शाळा, महाविद्यालये सुरू करा; लहुजी शक्ती सेनेने केले आंदोलन

या वेळी जिल्हाधिकारी व शिक्षण संचालक यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

एमपीसी न्यूज – शाळा, महाविद्यालये तातडीने सुरू करा, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेतर्फे आज, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन् केला होता. परंतु, आता सर्व टप्प्याटप्प्याने दुकाने, कारखाने, उद्योग, मॉल व इतर सर्वच व्यवहार सुरू करण्यात आले आहेत.आता मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरूद्वाराचे दरवाजे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

मात्र, ज्यांच्या हातात देशाचे भविष्य आहे. ती उद्याची पिढी असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद आहे. शिवाय गरीब आणि ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पोहचत नाही.

त्यामुळे लवकरात लवकर सर्व उपाय योजना करून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याची मागणी गुरुवारी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण संचालक कार्यालय येथे करण्यात आले.

या वेळी जिल्हाधिकारी व शिक्षण संचालक यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी अविनाश खिलारे, सनी साळवे, संजय फासगे, अनिकेत जवळेकर, सत्यभामा आवळे, नितीन वायदंडे, दत्ताभाऊ धडे, कुमार खंडागळे, विजय गाडे, भावेश कसबे, लोपा भगत, सुनीता अडागळे यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.