Pune News: जुना बाजार सुरू करा- सदानंद शेट्टी

सातत्याने लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वसामान्य व्यावसायिक हैराण झाला आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळली आहे. कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

एमपीसी न्यूज – जुना बाजार सुरू करून तिथे व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी गुरुवारी केली आहे.

अतिक्रमण खात्याचे प्रमुख माधव जगताप यांची भेट घेऊन यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी जगताप यांनी जुना बाजार सुरू करण्या संदर्भात अनुकूलता दाखविली आहे. महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांची मान्यता घेऊन या व्यावसायिकांना बसून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, असे निवेदन शेट्टी यांनी जगताप यांना दिले.

यावेळी जुना बाजार संघटनेचे निजामभाई खकर उपस्थित होते. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही यासंबंधीचे निवेदन देण्यात येणार आहे. तर, मागील 5 ते 6 महिन्यांपासून कोरोनाचे संकट पुणे शहरात गंभीर झाले आहे.

सातत्याने लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वसामान्य व्यावसायिक हैराण झाला आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळली आहे. कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हा जुना बाजार तातडीने सुरू करून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सदानंद शेट्टी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.