Pune News : राज्य सरकारने 6 मीटर रुंदीकरणासाठी सुद्धा एफएसआय द्यावा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : शहरातील 6 मीटर रस्त्यांचे 9 मीटरमध्ये रुंदीकरण चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) दिल्याशिवाय करूच नये, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी राज्य सरकारने 6  मीटर रस्तारुंदीसाठी पण एफएसआय द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे महापालिका भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, पुण्यातील 6 मीटर रस्त्याचे 9 मीटरमध्ये रस्ता रुंदीकरण करण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही विनाकारण लोकांची घरे पाडणार नाही.

फक्त काही कॉलनीपुरते रस्तारुंदीकरण केले पाहीजे, विनाकारण रस्तारुंदी करणाची आमची मागणी नाही. राज्य सरकारने 6 मीटर रस्ता रुंदीकरणाला देखील एफएसआय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले.

मेट्रोला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याची मागणी महामेट्रोने केली आहे. परंतु पुणे महापालिका आणि पीएमआरडीए दोन प्राधिकरण असताना तिसरे नियोजन प्राधिकरणाचा दर्जा द्यावा का, यावर चर्चा सुरू आहे. हा संवेदनशील विषय असल्यामुळे त्यावर भाष्य करू शकणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.