Pune News : माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे पुण्यात आयोजन

एमपीसी न्यूज – माय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश असेल.

माय अर्थ फाउंडेशन, सस्टेनाबिलीटी इनिशिएटीव्हज, एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडिया व ध्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा फेस्टिवल आयोजित केला आहे. 11 आणि 12 जानेवारी पुण्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनात हा फेस्टिवल पार पडेल. माय अर्थ फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अनंत घरत यांनी हि माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

घरत म्हणाले, हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी संकटे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरिल लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील जास्तीत जास्त युवकांनी या लघुपट महोत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन अनंत घरत यांनी केले आहे. राज्यस्तरीय पुणे पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत [email protected] यावर मेल करावा किंवा 9561792055 यावर संपर्क साधण्याचे आवाहन सोमनाथ पाटील यांनी केले.

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी व संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे यांनी केले. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता हा विषयावर जास्तीत जास्त प्रबोधनात्मक फिल्म्स व्हाव्यात, असे मत ललित राठी यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.