Pune News : भूविकास बँकेची थकबाकी भरण्यासाठी राज्याची एक रक्कमी कर्ज परतफेड योजना

एमपीसी न्यूज – भूविकास बँकेची थकबाकी भरण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक रक्कमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे. 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांनी थकबाकी त्वरीत भुविकास बॅंकेत भरावी आणि आपला 7/12 उतारा कोरा करुन घ्यावा, असे आवाहन पुणे ग्रामीण, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने 20 ऑक्टोबर 2020 रोजी भुविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एक रक्कमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. दिर्घ कालावधीपासून थकीत कर्ज विचारात घेता एक रक्कमी कर्ज परत फेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

एक रक्कमी कर्ज परतफेड योजना थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी म्हणून राबवली जात आहे. 9 मार्च 2021 अखेर 22 थकबाकीदारांनी 42 लाख 68 हजार रुपयांचा भरणा करुन एक रक्कमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेचा लाभ घेऊन आपला 7/12 उतारा कोरा केला आहे.

पुणे जिल्ह्यातील थकबाकीदारांनी बँकेचे मुख्य कार्यालय पुणे 1 सेंट्रल बिल्डिंग समोर, बी.जे.रोड पुणे स्टेशन जवळ, तसेच गुलटेकडी मार्केट यार्ड, येथील हवेली शाखा, इंदापूर शाखा व शिरूर शाखा येथील कार्यालयांशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला आपला 7/12 उतारा कोरा करून घ्यावा, असे अवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.