Pune News : दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगार प्रदीप अडागळे एक वर्षासाठी स्थानबद्ध

एमपीसी न्यूज – दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगार प्रदीप अडागळे याला (एमपीडीए) कायद्याअंतर्गत लष्कर पोलीस ठाण्यात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी याबाबत आदेश जारी करण्यात आले.

प्रदीप राम अडागळे ( वय 27, रा. सोलापूर बाजार, कॅम्प, पुणे ) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप अडागळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, जीवघेणी हत्यारे बाळगणे, दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.  त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत निर्माण करणे यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास कुणी धजावत नव्हते. अडागळेला एमपीडीए कायद्याअंतर्गत लष्कर पोलीस ठाण्यात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.