Pune News : सुबुद्ध मित्र मंडळातर्फे प्रजासत्तक दिनी कोविड योद्ध्यांचा गौरव

एमपीसी न्यूज: सुबुद्ध मित्र मंडळातर्फे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात समाजपयोगी काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम काल शुक्रवार पेठेतील जैन मंदिराशेजारी झाला असून याचे आयोजन शिवसेना प्रभाग क्र. 18 चे प्रमुख पै. भरत चौधरी यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळेस कोविड साथीच्या काळात 280 अंत्यविधी करणारे साबीर सय्यद, साबीर शेख तसेच दीपक बीडकर, प्रमोद गव्हाणे, विक्रांत गवळी, सोमनाथ काची, सुलक्षणा नाईक यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर रक्तदान, रिक्षा सेवा, बॅंक सेवा, शिक्षण सेवा, म. न. पा. कर्मचारी सेवा, भाजीपाला सेवा, सामाजिक कार्य, विद्युत विभाग सेवा, अशा सेवांसाठी काम केलेल्या अनेकांचा सत्कार यावेळेस करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास चौधरी यांनी केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अण्णा कुंजीर, अजिम खान, सोमनाथ टेंबेकर, भागणे बंधू, स्वप्निल आंग्रे यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.