Pune News : मुलबाळ होत नाही म्हणून होणा-या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – मुलबाळ होत नाही म्हणून तसेच दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावे यासाठी होणा-या सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून 21 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. हिही घटना किरकिटवाडी (ता. हवेली) येथे रविवारी (दि.1) घडली.

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेच्या वडिलांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती व इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय महिलेचा जानेवारी 2019 मध्ये विवाह झाला होता. तिचा पती व सासरचे लोक मुलबाळ होत नाही म्हणून तसेच दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावे यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या त्रासाला कंटाळून तिने रविवारी (दि.1) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.