Pune News : सुप्रिया सुळे यांनी सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुण्यातील आंबील ओढ्यालगत असलेल्या घरांवर काल पुणे महापालिकेने कोणताही विचार न करता, सहानभूती न दाखवता बुलडोझर चालवला. महापालिकेच्या असंवेदनशील कृतीवर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या. झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं, असं मोहोळ म्हणाले.

आंबिल ओढ्यालगतच्या घरांवर कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली हे सर्वांना माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचं पुण्यात येणं कमी झालेलं आहे. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी माहिती घेऊन बोललं तर बरं होईल, असं महापौर मोहोळ म्हणाले.

दरम्यान झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला महापौर मोहोळ यांनी तडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मला झेपत नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला देण्याऐवजी स्वतः आत्मपरीक्षण करावं, असं उत्तर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना दिल

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलीस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती.

बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.