Pune News : मुळशी धरणातील पाणी पश्चिम भागाला देण्यासाठी सर्वेक्षण करा : राष्ट्रवादी काँग्रेस

एमपीसी न्यूज : वाढती लोकसंख्या आणि नागरीकीकरणामुळे पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीलगतच्या पश्चिम भागाला मुळशी धरणातील 5 ते 7 टीएमएसी पाणी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली.

त्या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांसह संबंधित मंत्रीगटाला पत्रव्यवहार करावा. तसेच आगामी अंदाजपत्रकात सर्वेक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. या मागणीला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

या मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक बाबुराव चांदेरे, दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, गणेश ढोरे, प्रकाश कदम, प्रशांत जगताप, शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, प्रदिप धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.