Pune News : त्या’ गुन्ह्यातून उषा काकडे यांचे नाव वगळण्यास  स्थगिती; उच्च न्यायालयाचा दणका

एमपीसी न्यूज- बदनामी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय दत्तात्रेय काकडे व त्यांच्या पत्नी उषा  काकडे (Pune News) यांच्यावरील दाखल गुन्ह्यातील उषा काकडे यांचे नाव वगळण्यास सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, अशी माहिती तक्रारदार यांच्या वतीने देण्यात आली.  

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात भादवी कलम 500, 504, 506(2), 506 सह 34 अन्वये संजय काकडे आणि पत्नी उषा काकडे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यात त्यांच्याविरूद्ध दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायलयात दाखल केले होते.

Delhi news : माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

तर याप्रकरणात त्यांनी सत्र न्यायालयात संबंधीत गुन्ह्यातून उषा काकडे यांचे नाव वगळण्यात यावा, असा अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने त्यांचे नाव देखील गुन्ह्यातून वगळण्याबाबत आदेश दिले होते. परंतु, तक्रारदारांना याबाबत नोटीस न देता व त्यांची बाजू मांजण्याची संधी न देता न्यायालयात गुन्ह्यातून नाव वगळण्याबाबत अर्ज केला.

तसेच या आदेशाविरूद्ध युवराज ढमाले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणात उच्च न्यायालयाने प्रकरणाची दखल घेत उषा काकडे यांचा नाव वगळण्याचा निर्णयास स्थगित दिली. तसेच, उषा काकडे यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी दिले आहेत. तक्रारदार यांच्या वतीने ज्येष्ठ वकिल आबाद कोंडा, ऍड. सत्यव्रत जोशी, ऍड. निलेश त्रिभुवन व ॲड. विजयसिंह ठोंबरे ऍड. विशाल काळे (Pune News) यांनी कामकाज पाहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.