Pune News: स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सिंबायॉसिस डेटा सायन्सचे विद्यार्थी सॉफ्टवेअर एडिशन विभागात अव्वल

Pune News: Symbiosis Data Science students rank first in Software Edition section in Smart India Hackathon 36 तासांच्या या स्पर्धेत 1081 संघानी भाग घेतला होता.

एमपीसी न्यूज – स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 यांनी ‘प्रॉब्लेम स्टेटमेंट एजे 128’ या स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन केले होते. सिंबायॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या इंजिनियरिंग आणि डेटा सायन्सच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत डेटा सायन्सच्या विद्यार्थानी सॉफ्टवेअर एडिशन विभागात प्रथम क्रमांक पटकावला. टीम टाईशच्या संघाने हे यश मिळवले आहे. प्रांजल जोशी (संघनायक), ईसरा जाफरी इंजिनियरिंग विभाग आणि साहिल पानसरे, यश पाठक, मनस्वी पाटील आणि ग्रितिका परदेशी या संघात सामिल झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या डॉ. वैजयंती देशपांडे, डॉ. रुबी जैन, प्रो. सुमित डुबल यांनी मार्गदर्शन केले.

विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, कुलसचिव बी.बी.पाटील, ऑटोमोबाईल विभागाचे संचालक डॉ. चारुदत्त पाठक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

भारत सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालय, इनोव्हेशन सेल, एआयसीटीई आणि गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. 36 तासांच्या या स्पर्धेत 1081 संघानी भाग घेतला होता.

भारत सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालय, इनोव्हेशन सेल, एआयसीटीई आणि गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.