Pune News : सिंबायोसिसच्या कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. अश्विनी कुमार

एमपीसी न्यूज : सिंबायोसिसच्या कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. अश्विनी कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांनी 25 जानेवारीपासून पदभार स्विकारला आहे. संशोधन आणि विकासामधील तब्बल 36 वर्षांचा अनुभव पाठीशी असलेल्या अश्विन कुमार यांना प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्राचा देखील अनुभव आहे. इस्रो, बार्क, तोशिबा अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

डॉ. अश्विनी कुमार यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कंप्युटर सायन्समध्ये पदवी घेतली असून अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी याच विषयांतील एम. टेक पदवी घेतली आहे. पुढे ई-गव्हर्नन्समध्ये राजस्थान विद्यापीठातून त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे.

डिजीटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी राजस्थान सरकारमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना लोकमित्र, जनमित्र, मुख्य मंत्री माहिती व्यवस्था, हॉस्पिटल व्यवस्थापन माहिती व्यवस्था, पोलीसांसाठी संदेश सुविधा, अशा अनेक प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. याचबरोबर 2012-17 यां काळांत व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन ज्ञानाची देवाणघेवाण, ऑनलाईन परीक्षा आणि त्याचे ऑनलाईन मूल्यांकन करणे अशा गोष्टींना आरंभ केला.

2013 मध्ये अश्विनी कुमार यांच्या शासानाखाली असलेल्या NIELIT संस्थेला दलाल स्ट्रिट इन्व्हेस्टमेंट जर्नलकडून ‘सर्वात कार्यक्षम अशी वाढ करणारा’ पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठे स्थापन करण्यासाठी, तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ते ॲपेक्सचे AICTE, MHRD, भारत सरकार, महाराष्ट्र, राजस्थान सरकार यांच्याबरोबर सदस्य आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.