Pune News : पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कार्यालयात टेबल खुर्च्यांची चोरी

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय हरित न्यायधिकरणा च्या (एनजीटी) कार्यालयातून चोरट्यांनी खुर्च्या, टेबल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune News)आला आहे.

याबाबत ‘एनजीटी’चे कार्यालयीन अधिकारी विजय सिंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विधान भवन परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीत ‘एनजीटी’चे कार्यालय आहे. कार्यालयातील भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक टेबल आणि चार खुर्च्या चोरल्या आहेत.

Pimpri News : जंतर मंतर येथे 6 मार्च ला भव्य देशव्यापी आंदोलन

टेबल, खुर्च्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.‘एनजीटी’च्या कार्यालयात चोरी करणारा ओळखीचा असल्याचा संशय पोलिसांनी (Pune News)व्यक्त केला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार  करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.