Pune News : कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – कात्रज येथील संतोष नगरमध्ये हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणा-या व पुणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीसांनी गुरुवारी (दि.13) ही कारवाई केली.

लतिफ बागवान ऊर्फ साकिब मेहबुब चौधरी (वय 22, रा. कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी कात्रज येथील संतोष नगरमध्ये हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करुन दहशत निर्माण करीत फिरत होता.

त्याच्या भितीने लोकांनी दुकाने बंद केली.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. अटक आरोपी दोन वर्षांसाठी पुणे शहरातून तडीपार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.