Pune News: तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून अटक

एमपीसी न्यूज – पुणे शहरातून एक वर्षासाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून अटक करण्यात आली आहे. आज (बुधवारी) त्याला महात्मा फुले गंजपेठ येथून ताब्यात घेण्यात आले.

यशवंत नरसिंग साकीनाल (वय 29, रा.महात्मा फुले गंजपेठ, मिठापल्ली वाङ्या शेजारी, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या गुंडांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना तडीपार गुंड यशवंत नरसिंग साकीनाल हा गंजपेठ भागात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला महात्मा फुले गंजपेठ येथून ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याविरुध्द खडक पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, तडीपारी भंग यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला खङक पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे पुणे शहर अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, सहा पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, प्रतिबंधक गुन्हे पुणे शहर वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 3 राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ दीपक मते, नितीन रावळ, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.