Pune News : पॅनकार्ड क्लब येथे गैरप्रकार व नासधूस करणाऱ्यांचा त्वरित बंदोबस्त करा :  वंदना चव्हाण

याठिकाणी सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे, ही संपूर्ण वास्तू समाजकंटकांना खुली असून याठिकाणी अनेक गैरप्रकार घडत आहेत.

एमपीसी न्यूज – पॅनकार्ड क्लब येथे गैरप्रकार व नासधूस करणाऱ्यांचा बंदोबस्त त्वरित करा, अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे राज्यसभेच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकार ने Maharashtra Protection of Depositors (in Financial Establishment) Act 1999, खाली पॅनकार्ड क्लबची संपूर्ण मालमत्ता जप्त केली व डेप्युटी कलेक्टर, MPID मुंबई यांची नेमणूक जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी केली आहे. तरीही या  मालमत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचे व त्यातून चिंताजनक प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येताच त्वरित खासदार चव्हाण यांनी पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याची मागणी केली.

जप्त मालमत्तेमध्ये, “United 21, 5 Star Hotel” आणि “Area 51 Discotheque” पुण्यातील या मालमतेचा देखील समावेश आहे. काही समाजकंटकांकडून या  मालमत्तेची चोरीच्या हेतूने तोडफोड करण्यात आली व ही बाब चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पुणे पोलिसांकडे तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार लावून धरली.

_MPC_DIR_MPU_II

याआधी देखील जाळपोळ, तोडफोड, आणि चोरीची अनेक प्रकरणे या ठिकाणी घडून गेल्याचे निदर्शनास आले. चव्हाण यांच्या केलेल्या मागणीला यश येऊन पोलिसांनी काही जणांना अटक देखील केली.

Area 51 चा घुमट आणि इतर भागाला आग लावण्यात आली होती व United-21, 5-Star hotel ची काच फोडून आतील अल्युमिनम फ्रेमची चोरी घडली आहे. युट्यूबवर या सर्व प्रकारचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. चव्हाण यांच्या मागणीनुसार पोलिसांनी कारवाई करून अजूनही तेथील गैरकृत्य थांबलेले नाहीत. याठिकाणी सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे, ही संपूर्ण वास्तू समाजकंटकांना खुली असून याठिकाणी अनेक गैरप्रकार घडत आहेत. यामुळे, सदर जागेचे मूल्यांकन देखील कमी होत आहे.

8 सप्टेंबर 2020 ला, पुणे पोलीस कमिशनर यांना देखील पत्र लिहून संबंधित गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे. ही वास्तू आता डेप्युटी कमिशनर (MPID) मुंबई यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे, त्यांच्याकडे सदर ठिकाणी सुरक्षारक्षक नेमून त्वरित घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालावा, अशी विनंती चव्हाण यांनी पत्राद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.