Pune News : कागदपत्रे देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्याला अटक

एमपीसी न्यूज- माहिती अधिकारातील कागदपत्रे विनाशुल्क देण्याबाबत राज्य माहिती आयोगाचा आदेश असतानाही  दोन हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका तलाठ्याला अटक ( Pune News) केली. तसेच, त्याला कोतवालाने देखील मदत केली .या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.27) या दोघांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

Today’s Horoscope 28 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

संजय बाबूराव दाते (रा. उरवडे, ता. मुळशी) व अमित भंडलकर असे आरोपींचे नाव आहे. माहिती अधिकारातील कागदपत्रे विनाशुल्क देण्याबाबत राज्य माहिती आयोगाचा आदेश आहे. परंतु कागदपत्रे घेण्यासाठी तलाठी दाते हा दोन हजार रुपये लाचेची मागणी करीत आहे, अशी तक्रार एका 67 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक क्रांती पवार ( Pune News) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.