Pune News : ज्या गोष्टी चांगल्या आहेत, त्या शिक्षकांनी पाळल्या पाहिजे – प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर

एमपीसी न्यूज – ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या शिक्षकांनी पाळल्या पाहिजे, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी दिला.

वारजे माळवाडी परिसरातील सर्व शिक्षक गुरुजनांचा शिक्षक दिनानिमित्त शिक्षक गौरव समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन  अविस्मरा बँकवेट हॉल येथे केले होते.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके, प्रशांत मांडवे, नगरसेविका सायली वांजळे उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले की, आपल्या समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. हजारो गुरू आपल्या देशात झाले. शिक्षकांनी आपली महानता विसरली नाही पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी सर्वच समाजाच्या स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. आपण अभ्यास करायला विसरलो. स्वामी विवेकानंद शिक्षण माणूस घडावीणारे म्हणायचे. शैक्षणिक क्रांती होण्याची गरज आहे. दरवर्षी 10 मुले चांगली घडवायचे. परमेश्वरच्या बाजूने आपण राहतो की नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, शिक्षकांच्या कामाला सलामच केला पाहिजे. मुले गुरुजनांना आदर्श मानत असतात. कोरोनाचा काळात सुद्धा शिक्षकांनी खूपच चांगले काम केले आहे. ऑनलाइन शिक्षण सध्या सुरू आहे. प्रत्यक्षात शिक्षणात खूप फरक आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, 2019 आणि 2020 – 2021 च्या काळात शिक्षक दिनात खूप फरक पडला आहे. आता ऑनलाइन पद्धतीत मुले शिक्षण बेडवरच घेत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा सन्मानच केला पाहिजे. पृथ्वीवर ज्या ज्या वेळी संकट निर्माण होतो. त्या त्या वेळी शिक्षकांनाच पुढे जावे लागते. शिक्षकांचे हाल कमी होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.