Pune News : Tell Me Your Story And I Will Give You 10 Rupees”; लॉकडाउनच्या इफेक्टवर पुण्यातील तरूणाचा स्तुत्य उपक्रम

एमपीसीन्यूज : लॉकडाऊनमुळे तुम्ही नैराश्यात आहात ? तुम्हाला खूप काही बोलायचं पण ऐकायला कोणी नाही? या जगात आपलं कोणीच नाही, असे विचार तुमच्या मनात येतात? तुमच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतात?, तुमची मनस्थिती अशी असताना तुमच्याशी आपुलकीने बोलणारी, तुमच्या मनातले विचार ऐकून घेणारी एखादी व्यक्ती भेटली तर, तुम्ही त्याच्याशी नक्की बोलाल.

अशाच तुमच्या मनातील भावना ऐकून घेणारा एक तरुण तुम्हाला फर्ग्युसन रस्त्यावर भेटेल. या रस्त्यावर ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी हा तरुण “Tell Me Your Story And I Will Give You 10 Rupees” असा फलक धरून उभा असलेला दिसेल.

तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही त्याला सांगू शकता. तो हे सर्व काही ऐकून घेतो आणि त्या बदल्यात तुम्हाला दहा रुपये सुद्धा देतो. राज डगवार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आपल्या या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना राज सांगतो, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना व्यवसायात नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्यात सध्या नैराश्याची भावना आहे.

यामुळेच अनेकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. अशीच परिस्थिती माझीही होती. तेव्हा मी सोशल मीडियावर अशीच संकल्पना असणारी एक पोस्ट पाहिली. ते पाहिल्यानंतर आपण लोकांचे म्हणणे ऐकून घेतलं तर त्यांना जाणारा एकटेपणा कदाचित दूर होईल असा विचार माझ्या मनात आला.

आणि त्यानंतर मी हा उपक्रम सुरू केला. माझ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.