Pune News : शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरु

एमपीसीन्यूज : पुण्यातील 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये म्हटले आहे. महापालिकेचे 2021 – 22 चा अंदाजपत्रक नुकतेच सादर करण्यात आले. त्यानुसार महापालिकेने नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पुण्यात निर्माण होणाऱ्या 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सरकारने ‘जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी’च्या (जायका) माध्यमातून 900 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या प्रकल्पाला गती देण्यासाठी नुकतीच केंद्रामध्ये बैठक झाली. त्यामध्ये ‘वन सिटी वन ऑपरेटर’ निविदा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यानुसार महापालिकेने नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पात 11 ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे, सुमारे 113 किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या विकसीत करणे, जीआयएस / एआयएस, skada यंत्रणा उभारणे, कम्युनिटी टॉयलेट ब्लॉक उभारणे अशा 13 पॅकेजेसच्या कामांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.