Pune News : नवले पुल परिसरात भीषण अपघात; ट्रकची 7 ते 8 वाहनांना धडक

एमपीसी न्यूज – पुण्यातील नवले पुल परिसरात एका भरधाव ट्रकने 7 ते 8 वाहनांना उडविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात 6 जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस आणि वाहतूक विभागाच्या पोलिसांनी धाव घेऊन वाहने बाजूला करण्याचे काम सूरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या 14 टायर माल वाहतूक ट्रक भरधाव वेगात असल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याने वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली. त्याने कार, रिक्षा अशा 8 वाहनांना उडवले आहे. यात एक महिला गंभीर जखमी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.