Pune News : ठाकरे पिता पुत्रांना मंदिरांपेक्षा पब आणि बार वाल्यांची काळजी : आशिष शेलार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : राज्यातील ठाकरे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे. ते नेहमी जनतेच्या प्रश्नावर पळ काढतात. मंदिरे उघडा म्हटले की मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट दाखवितात. ठाकरे पिता पुत्रांना मंदिरांपेक्षा पब आणि बार वाल्यांची काळजी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, राज्यातील ठाकरे सरकार म्हणते शालेय विद्यार्थ्यांची फी वाढ कमी करायची असेल तर कोर्टात जा.

शाळा सुरू करण्यावर सर्वांशी चर्चाही करत नाहीत आणि निर्णयही घेत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि  कर्जमाफी द्या म्हटले,पॅकेज मागितले की केंद्राकडे बोट दाखवतात.

तर मराठा आरक्षणासाठी वकिल गैरहजर राहतात, हे सुप्रिम कोर्टाकडे बोट दाखवतात. पदवी परिक्षा घ्या म्हटले की युवासेनेकडे बोट दाखवतात. बदल्यांचा विषय आला की दलालाकडे बोट करतात, मंदिर उघडा म्हटले की मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट करतात. बॉलीवूड उत्तर प्रदेशात जाऊ देणार नाही, असे म्हणतात.

मंदिरे उघडा म्हटले की नियमावली पाहतात, पब आणि बार वाल्याची यांना मागणी केलेली नसताना वेळ वाढवून देतात. ठाकरे पिता पुत्रांना मंदिरवाल्यापेक्षा पब-बार वाल्यांची काळजी आहे, अशी टीका त्यांनी केला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.