Pune News : डॉ.पी.ए. इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज ‘ पॅनल विजयी

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी निवडणूक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत डॉ.पी. ए. इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज ‘ पॅनल चे सर्वच्या सर्व 13 उमेदवार 76 टक्के मतदान घेऊन प्रचंड बहुमताने निवडून आले. रविवारी (दि.27) जानेवारी ही निवडणूक पार पडली.

एकूण तेरा पदांसाठी ही निवडणूक झाली. 3 हजार मतदारांपैकी 45 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ‘अवामी महाज’ पॅनलच्या 13 उमेदवारांना 76 टक्के मते मिळाली. चुरशीच्या वातावरणात झालेल्या निवडणूकीचा रविवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आला. विरोधी 13 उमेदवारांना 24 टक्के मते मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

‘एम.सी.ई. सोसायटीच्या सर्व सभासदांनी आमच्या पॅनलच्या नेतृत्वावर पुनश्च विश्वास दाखवला व मोठ्या मताधिक्‍याने निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचा मी आभारी आहे . ‘नाही रे’ वर्गापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आम्ही कार्यरत होतो आणि त्याच ध्यासाने यापुढेही कार्यरत राहू’ अशी प्रतिक्रिया डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली.

पुणे कॅम्प परिसरात असलेल्या या संस्थेत 32 शैक्षणिक आस्थापना असून 27 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. अ‍ॅड. जे. एफ. शेरकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.