Pune News : लक्ष्मीपूजन करुन ठेवलेली रोकड व दागिने घरफोडी करून चोरले

एमपीसी न्यूज – लक्ष्मीपूजन करुन ठेवलेली रोकड व दागिने चोरट्याने घरफोडी करून चोरुन नेले. पौड येथील जल मल्हार सोसायटीत रविवारी (दि.15) पहाटे साडे सहा ते सातच्या दरम्यान हि घटना घडली.

याप्रकरणी 46 वर्षीय महिलेनं कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी सकाळी घराचे दार ओढून प्रभात फेरीसाठी बाहेर पडल्या. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसून लक्ष्मी पूजन करून ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 2 लाख 48 हजार किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.