Pune crime News : घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी स्वारगेट पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – महर्षीनगर भागातील एका सोसायटीत घरफोडी करण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, कटावणी असा साठा करण्यात आला आहे.

अनिल सुनिल कांबळे (वय 24), अक्षय मनोज कांबळे (वय 26), हैदर रहिम मिर्झा (वय 26), शिवप्रसाद महादेव धेंडे (वय 24, सर्व रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), अदित्य सुरेश पवार (वय 19, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महर्षीनगर भागातील आनंद पार्क परिसरात एका सोसायटीत घरफोडी करण्याच्या तयारीत चोरट्यांची टोळी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री सापळा लावून या टोळीला पकडले.

यावेळी एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर इतरांना पकडून झडती घेतली असता त्यांच्याजवळ तलवार, कटावणी, दांडके, दोरी असा मुद्देमाल जप्त केला. माहितीत ते या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले असून, त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.