Pune News : शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार सुरळीत

एमपीसी न्यूज –  पर्वती जलकेंद्र पंपिंग,लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी, वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता मात्र  26 मे रोजी हा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.

 

पाणी पुरवठा चालू असणारा भाग

 

पर्वती जलकेंद्र भाग – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, एरंडवणा, संपूर्ण कोथरुड,डहाणूकर कोलनी, कर्वेनगर, सेमिनरी झोनवरील मिठानगर

 

लष्कर जलकेंद्र पंपींग भाग – लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता,रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर इत्यादी

 

वारजे जलकेंद्र परिसर – भुसारी कोलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, बालेवाडी, बाणेर, पाषाण, वारजे हाय वे परिसर, रामनगर, हॅपी कोलनी, परमहंसनगर, कोथरुड, गांधीभवन आदी

 

नवीन व जुने होळकर जलकेंद्र भाग – मुळा रोड, खडकी, हरिगंगा, एमईएस आदी

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.