Pune News : स्थानिक ब्राह्मणांची भाजपावरील नाराजी झळकली बॅनरद्वारे

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा आणि पिंपरी या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कसबा मतदार संघात त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी भावना स्थानिक ब्राह्मणांची होती. मात्र भाजपकडून ( Pune News ) उमेदवारी देण्यात आली नाही. ही नाराजी आज बॅनरद्वारे झळकताना दिसली.

‘कसब्यातील एक जागरूक मतदार’ या नावाने लिखित … कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा का ?” …समाज कुठवर सहन करणार ? असा मजकूर असलेल्या बॅनरची चर्चा शहरात चालू आहे. यावरून भाजपावर आता स्थानिक ब्राह्मण समाजात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे.

Pune Crime News : पुणे विद्यार्थी गृहाच्या पदाधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी

हे बॅनर नेमके कुणी लावले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर ( Pune News ) आलेली नाही. मात्र, स्थानिक ब्राह्मण समाजाची भाजपावरील नाराजी मात्र यातून स्पष्ट होते आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.