Pune Corona News : जिल्ह्यात 11,929 सक्रिय रुग्ण, बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.91 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 24 हजार 294 झाली आहे. त्यापैकी 3 लाख 04 हजार 550 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर, ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 929 आहे. पुणे जिल्हयात कोरोना बाधीत एकुण 7 हजार 815 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.91 टक्के आहे.

पुणे विभाग

विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 04 हजार 965 झाली आहे. विभागातील 4 लाख 71 हजार 084 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 767 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 14 हजार 114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के इतके आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे विभागामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.29 टक्के आहे. कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 441 ने वाढ झाली आहे त्यामध्ये पुणे जिल्हयात 717, सातारा जिल्हयात 156, सोलापूर जिल्हयात 423, सांगली जिल्हयात 99, कोल्हापूर जिल्हयात 46 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे.

विभागामध्ये रविवारी (दि.01) बऱ्या होणा-या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 267 आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 815, सातारा जिल्हयामध्ये 125, सोलापूर जिल्हयामध्य 1119, सांगली जिल्हयामध्ये 176 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 32 रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 24 लाख 05 हजार 061 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 04 हजार 965 नमून्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.