Pune News :‘गोष्टींची गोष्ट’ नाटकाने पटकावले राजा नातू करंडक

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासकने प्राथमिक गटातील नाटिका स्पर्धा ते पुरुषोत्तम करंडक या दोन स्पर्धांमधील दुवा साधला जावा या उद्देशाने यंदाच्या वर्षीपासून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी नाटिका स्पर्धा सुरू केली आहे. कै. राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ (Pune News)राजा नातू करंडक अशा नावाने ही स्पर्धा संबोधली जात आहे. भरत नाट्य मंदिरात ही स्पर्धा झाली. त्यानंतर सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत 23 शाळांचे संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
लेखन पुरस्कार (नाटिकेचे नाव, लेखक, कंसात पुरस्काराचे नाव आणि शाळा या क्रमाने) ‘पळता भुई थोडी‘, श्वेता देशमुख (वास्तूप्रसाद करंडक, सेवासदन इंग्लिश मिडियम स्कूल)
उत्तेजनार्थ लेखन : ‘माऊली मूर्ती विठ्ठलाची‘, स्मिता पवार, मॉर्डन हायस्कूल (मुलांचे) शिवाजीनगर.
दिग्दर्शन पुरस्कार : (नाटिकेचे नाव, लेखक, कंसात पुरस्काराचे नाव आणि शाळा या क्रमाने) ‘गोष्टींची गोष्ट‘, अमृता जोगदेव (मधू जोशी करंडक, आर्यन वर्ल्ड स्कूल वारजे).
दिग्दर्शन उत्तेजनार्थ : ‘दर्पण‘, मंगेश माने, मधुराणी सरदेसाई, प्रमिला साळवे (नूमवि मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय).
अभिनय पुरस्कार : (विद्यार्थ्याचे नाव, भूमिका, कंसात नाटिकेचे नाव, शाळा आणि पुरस्कार या क्रमाने) : अनुष्का गोसावी, ‘गजरा‘, ‘बळी‘ (आर्यन वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ करंडक).
सर्वोत्तम अभिनय (विद्यार्थी) : कृष्णकांत बहिरट, ‘माऊली‘, ‘माऊलीन मूर्ती विठ्ठलाची (मार्डन हायस्कूल मुलांचे, शिवाजीनगर).
सर्वोत्तम अभिनय (विद्यार्थिनी) मधुजा मिठभाकरे, ‘परिकथा आजी‘, ‘गोष्टींची गोष्ट‘ (आर्यन वर्ल्ड स्कूल, वारजे).
सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय : इशिता केळकर, ‘माधवी‘, ‘आकार‘ (झिल एज्युकेशन सोसायटीचे सिल्व्हर क्रेस्ट स्कूल, इंदिरा सदाशिव स्वराभिनय करंडक).
अभिनय उत्तेजनार्थ : श्रावणी बोकिल, चिरायू बर्डे, सर्वेश जगताप, अमोघ पाटील, आर्या निगडे, वेदश्री उद्गीरकर, ऋषभराज शामसुंदरसिंह, किमया घाडी, अस्मी गोगटे, ऋग्वेद मुळे.