Pune News: पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा दुपटीचा कालावधी 35.43 दिवसांवर- महापौर

पुणे शहरात सध्या 726 गंभीर रुग्ण असून, त्यात 428 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 65 हजार 966 रुग्ण झाले आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. रुग्णसंख्येचा दुपटीचा कालावधी आता 35.43 दिवसांवर आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

शहरात अवघे 23.97 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुक्त रुग्णसंख्येची टक्केवारी 73.70 टक्के आहे. तर, 2.33 टक्के मृत्युदर खाली आला आहे. पुणे शहरात रोज कोरोनाच्या 6 हजारांच्या वर चाचण्या करण्यात येत आहे.

त्यामध्ये 1300 वर रुग्ण आढळून येत आहेत. तर, त्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत. पुणे शहरात सध्या 726 गंभीर रुग्ण असून, त्यात 428 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 65 हजार 966 रुग्ण झाले आहेत.


48 हजार 614 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 540 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 812 सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याचे कारण नाही. या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. योग्यवेळी उपचार घेतल्यास कोरोना सुद्धा बरा होऊ शकतो, हे हजारो नागरिकांनी दाखवून दिले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्ण वाढत आहे. हे रुग्ण ओळखून तातडीने त्यांच्यावर उपचार करणे सोपे होत आहे. त्याचबरोबर त्यांच्यापासून इतर जणांना होणारा संसर्गजन्य कोरोना रोखता येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.