Pune News : महापालिकेच्या मुख्य सभेत सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा !

एमपीसी न्यूज : एकीकडे शहरामध्ये तोंडाला मास्क लावला नाही म्हणून पुणेकरांकडून 500 रुपये दंड आकारला जातोय. पुणे महापालिकेच्या पावत्या हातात ठेवल्या जातायत. तर दुसरीकडे पुणे महापालिकेच्या मुख्य सभे दरम्यान सभागृहामध्ये सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा उडवला जातोय. तसेच काही नगरसेवक-नगरसेविका यांनी तर मास्कच लावला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लोकप्रतिनिधींवर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बुधवारी पुणे महापालिकेच्या दहा मुख्य सभा कुठल्याही विषयांवर चर्चा न होता तहकूब झाल्या. दरम्यान, शहरातील कचरा समस्या, सांडपाणी व्यवस्थापन कोलमडल्यामुळे शहरात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरल्याची जाणीव करून देण्यासाठी महापौरांसमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी विंगेमध्ये गर्दी केली.

यावेळी सोशल डिस्टन्सिगचा फज्जा तर उडालाच पण काही सदस्यांनी तोंडावर मास्कच लावले नसल्याची धक्कादायक घटना घडली.

महापालिकेच्या जवळपास डझनभर नगरसेवकांना कोरोना झाला होता. सुरक्षिततेच्या कारणास्तव काही नगरसेवक-नगरसेविका झुम मिटींगद्वारे मुख्य सभेला हजेरी लावत आहे. परंतु जे नगरसेवक सभागृहात प्रत्यक्ष हजर राहात आहेत, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे पुणेकरांवर विना मास्कसाठी दंडात्मक कारवाई सुरू असताना पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत विनामास्क फिरणाऱ्या नगरसेवक-नगरसेविकांविरोधात कोण कारवाई करणार, अशी कुजबूज उपस्थित नागरिक करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.