Pune News : सरकारने केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर एकतर्फी निर्णय घेतले – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सरकार आणि युवासेनेने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यासाठी जी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती ती फेटाळली आहे.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सरकार आणि युवासेनेने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यासाठी जी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती ती फेटाळली आहे. परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाही आणि अशी पदवी काहीच कामाची राहणार नाही, असे म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परिक्षा संबंधी निर्णयाचे स्वागत केले. 

पुण्यातील बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांसी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेशिवाय पदवी देऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगितलं आहे.

देशभरातील कुलगुरुंचंही हेच मत होतं. राज्य सरकारने यासाठी जी कमिटी तयार केली होती त्यांनीही हाच रिपोर्ट दिला होता.

तरीही केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय़ घेत होतं. त्याचा भविष्यात आमच्या मुलांवर परिणाम झाला असता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज परीक्षा नाही याचा कदाचित काही लोकांना आनंद झाला असता पण भविष्यात त्यांची पदवी काही कामाची राहिली नसती. सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिला असल्याने विद्यार्थ्यांचा फायदाच होईल, तोटा होणार नाही. त्यांच्या पदवीला मूल्य असेल. मूल्य नसणारी पदवी त्यांना प्राप्त करावी लागणार नाही, असे देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.