Pune News : पुणे महापालिकेचे लष्कराकडे साकडं, केली ही मागणी

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे.

त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ रुग्णालयांवर आली आहे. अशावेळी पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेतली जाणार आहे. पुणे महानगर पालिकेने याबाबत निर्णय घेतला सून याची अंलबजावणीही केली जाणार आहे.

पुण्यात सध्या व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील लष्कराचं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांनासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलीय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.