Pune News : कोरोना संकटकाळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बजावलेली कामगिरी प्रशंसनीय : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटकाळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावलेली कामगिरी प्रशंसनीय व अभिमानास्पद आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोरोनाकाळात आपले काम चोखपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोरोनाकाळात नागरिकांच्या हितासाठी कार्य करत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा व चतुर्थ श्रेणी कामगारांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित आयोजित सेवा-सप्ताहचा समारोप या कार्यक्रमाने करण्यात आला.

संकटकाळात कसे वागायचे, राष्ट्रीय कर्तव्याचे उदाहरण नरवीर तानाजीराव व मावळ्यांनी सिंहगड मोहिमेच्या वेळेस आपल्याला घालून दिले. याच मावळ्यांच्या पावलावर चालून, समस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून लोकांसाठी कार्य केले, याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे दीपक नागपुरे म्हणाले.

शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेल्या कोरोनाकाळातील विविध उपक्रमांची म्हणजे धान्य किट वाटप, खिचडी वाटप, सॅनिटायझर टनल उभारणी, मोफत घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी, फेस शिल्ड व मास्क वाटप, आर्सेनिक गोळ्या वाटप इत्यादींची माहिती दिली.

यावेळी चतुर्थ श्रेणी कामगारांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांना वाफेचे यंत्र देऊन सत्कार करण्यात आला. एकूण 100 वाफेचे यंत्र कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी हिंदू जागरण मंच पुणे शहरप्रमुख निलेश भिसे, आमदार भीमराव तापकीर, भाजपा शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे, सुनील मारणे, अरुण राजवाडे, भाजयुमो शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर, सरचिटणीस प्रतीक देसरडा, अभिजित राऊत, सचिन मोरे, वृषाली शेकदार, ईशानी जोशी, हरीश परदेशी उपस्थित होते. मनपाचे अधिकारी जयश्री काटकर, संभाजी खोत, संतोष भाईक, आशिष सुपनार, केतन निकम, महेंद्र बहिरम उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.