Pune news: उपसभापती पदाचा उपयोग समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापती पदावर पुनर्नियुक्ती झाल्याच्या अनुषंगाने त्यांनी आज (सोमवारी) पुण्यातील पत्रकारांसोबत एक वेबिनार घेण्यात आला.

एमपीसी न्यूज – उपसभापती पद हे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मिळाले आहे. या पदाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्की करेन, अशी ग्वाही विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिली.

डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापती पदावर पुनर्नियुक्ती झाल्याच्या अनुषंगाने त्यांनी आज (सोमवारी) पुण्यातील पत्रकारांसोबत एक वेबिनार घेण्यात आला.

वेबिनारमध्य दैनिक लोकसत्ताचे पुणे निवासी संपादक मुकुंद संगोराम, सकाळचे पुणे संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाईम्सचे पुणे संपादक श्रीधर लोणी, केसरीचे स्वप्नील पोरे तसेच संभाजी पाटील, विठ्ठल जाधव आदी पत्रकार सहभागी झाले होते.

यावेळी अनेक विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्यामध्ये एक विशेष व्यासपीठ तयार करावे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून महिलांचे प्रश्‍न सोडवण्याच्या हेतूने प्रयत्न करावा, दीड लाखांच्या आतील बिलं आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे विशेष पथकामार्फत तपासली जात नाहीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होते अशा प्रकारची तक्रार झाल्याची माहिती गो-हे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य जवळच्या जिल्हयातील सारख्या स्वरुपातील प्रश्न सोडवण्याचे अनुषंगाने पुण्यामध्ये विधान भवनातं एक ऑफिस असावे. त्यामुळे भारतीय लोकशाहीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विधान भवनाच्या कामकाज संदर्भात अभ्यास व कामांचा पाठपुरावा सोपा होईल, अशी चर्चा वेबिनारमध्ये झाली.

हक्कभंग या आयुधाचा वापर योग्य प्रकारे व प्रभावीपणे कसा करता येईल. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेकांचे रोजगार गेले व अनेकांना विज बिल मोठ्या प्रमाणे वाढून आलेले आहे. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQ) देण्यात येणार असल्याबाबत बातम्या येत आहेत. मुलांची ह्या परिक्षेबाबत कोणतेच ज्ञान नाही, अशा प्रकारच्या प्रश्नांवर नीलमताई गो-हे यांनी लक्ष घालावे, अशा अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केल्या.

या प्रश्नांवर उत्तर देत असताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या प्रश्नासंदर्भात विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासित करण्यात आले व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.