Pune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

पाणी द्या पाणी ; सर्वोपक्षीय नगरसेवकांचा आर्त टाहो

एमपीसी न्यूज – धरणांत पाणीसाठा असताना, पुणे शहरात, उपनगरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. आज झालेल्या पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वोपक्षीय नगरसेवकांनी पाणी द्या, पाणी द्या, अशी आर्त टाहो फोडला. जवळपास 25 नगरसेवकांनी पाणी मिळत नसल्याची तक्रार केली.

विशाल धनवडे म्हणाले, मागील 2 महिन्यापासून माझ्या प्रभागात पाणी नाही. पल्लवी जावळे म्हणाले, पाण्याचे व्यवस्थित नियोजन होत नाही. उडवाउडवीचे उत्तरे देऊ नका.

प्राची आल्हाट म्हणाल्या, आमचा प्रभागात सर्वाधिक टँकर आहेत. गफूरभाई पठाण म्हणाले, गेली 4 वर्षे झाले पाण्यासंदर्भात चर्चा होत आहे. आमच्याकडे 1 तसाच पाणीपुरवठा होत आहे. प्रभाग 27 मध्ये पाणी न मिळाल्याने हाल होत आहे. प्रेशरने पाणीपुरवठा करण्यात यावा. शेजारच्या प्रभागात चांगला पाणीपुरवठा होत आहे. आमच्यावर अन्याय होत आहे.

गणेश ढोरे म्हणाले, समाविष्ट 11 गावांत पाण्याची टंचाई आहे. आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी चर्चा केली, मात्र काहीही उपयोग झाला नाही. बाबुराव चांदेरे म्हणाले, समाविष्ट गावात पाणी मिळण्यासाठी गंभीरपणे विचार करावा.

योगेश ससाणे म्हणाले, आमच्या प्रभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. भामा आसखेडचे पाणी आम्हाला मिळावे.

वसंत मोरे म्हणाले, मध्यवर्ती भागांत नगरसेवक पाण्यासाठी भांडतायेत. तर, आम्ही उपनगर वासीयांनी जलसमाधीच घेतलेली बरी. 24 बाय 7 सर्वाधिक मीटर बसविले. आम्हाला पाणी मिळण्याची अपेक्षा होती. ती फोल ठरली. कर भरमसाठ आकारला जातोय, पण पाणी मिळत नाही. खडकवासला, भामा आसखेडचे पाणी मुरतेय कुठे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. समाविष्ट गावांत लक्ष द्यावे. आणखी गावांना पाणीपुरवठा कसा होणार?

सचिन दोडके म्हणाले, पाण्यासाठी शिवणे – उत्तमनगर भागात लोकांचे हाल होतातयेत. समाविष्ट गावांना पाणी द्या. जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करावी.

अजय खेडेकर म्हणाले, 24 बाय 7 योजनेचे काम सुरू आहे. पाण्याचे नियोजन करून काम करा. राजाभाऊ लायगुडे म्हणाले, प्रभाग 33 मध्ये पाण्याची समस्या बिकट आहे.

आबा तुपे म्हणाले, गेली 15 दिवस झाले पाण्याची समस्या गंभीर आहे. फुरसुंगी, urali, साडेसतरानळी या गावात लोकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

भैय्यासाहेब जाधव म्हणाले, पाणी प्रश्नाकडे गंभीरपणे पहा. भामा आसखेडचे पाणी खराडीला मिळत नाही.

दिलीप वेडेपाटील म्हणाले, आमच्या प्रभागात 24 बाय 7 योजनेचे काम अतिशय संथपणे सुरू आहे.

सुभाष जगताप म्हणाले, पुणे हे शहर वेगाने वाढत आहे. आकर्षक शहर आहे. 2200 कोटींचा समान पाणीपुरवठा योजना सुरू केली. अडीच हजार कोटीचा प्रकल्प आहे. ही योजना योग्य नाही. बहुमताच्या जोरावर ही योजना मंजूर केली. ही पुणेकरांची फसवणूकच केली. यावर्षी मागील वर्षीपेक्षा धरणांत चांगला पाणीसाठा आहे. सहकार नगर परिसरात पाण्याची समस्या बिकट आहे.

विशाल तांबे म्हणाले, जून महिन्यात पाण्याची चर्चा करतोय हे दुर्दैव आहे. 24 बाय 7 योजना समान पाणीपुरवठा झाली.

प्रशांत जगताप म्हणाले, मेट्रोच्या प्रोजेक्टसाठी जमीन दिलेल्या प्रकल्प ग्रस्तांना हडपसर भागात सदनिका दिल्या. 14 व्या आणि 21 व्या मजल्यावर पाणी न्यावे लागते. लोक अक्षरशः वैतागले. 34 गावांना पाणीपुरवठा कसा करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हरिदास चरवड, गोपाळ चिंतल, कविता वैरागे, संगीता ठोसर, प्रिया गदादे, प्रकाश कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर खुलासा करताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, असमान पाणीपुरवठा दूर करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना आहे. 82 टाक्याचे काम जोरात सुरू आहे. या योजनेसाठी लागणारे मजूर गावाला गेले. त्यांना विमानाने आणले जात आहेत. लाईन्स खूप जुन्या आहेत. यावर्षी अखेर 50 झोन सुरू होतील. 34 गावांना 24 तास पाणी मिळावे, यासाठी सल्लागार नेमलाय. फुरसुंगी, उरुळी देवाची परिसरात 200 टँकर सुरू आहेत. मुळशी धरणातुन 5 टीएमसी पाणी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवितोय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.