Pune News : सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दहा दिवसात पुणे महापालिकेन केला तीन लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज –  सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून पुणे महापालिकेने दहा दिवसात तीन लाखांचा दंड वसूल केला(Pune News)  आहे. यामध्ये पालिकेने 353 जणांवर कारवाई केली आहे.

या कारवाईसाठी पालिका प्रशासनाने विशेष पथक तयार केले आहे. जी – 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गेल्या आठवड्यापासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत रस्यावर कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अशा विविध सुचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक जण या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत. अशा लोकांवर आता पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

 

Pune news: हांडेवाडी येथे आगीत वाहने भस्मसात

गेल्या 10 दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून महापालिकेने साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर पहिल्या तीन दिवसांतच 123 लोकांवर कारवाई करत 1.23 लाख रुपयांचा दंड वसूल केला (Pune News) असल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.केवळ जी 20 पुरतीच नाही तर या पुढेही ही मोहिम सुरु राहील असे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.