Protest against GST: केंद्रच्या 5% जीएसटी लागू करण्याचा निर्णयाविरोधात 16 जुलैला बंद

  द पुना मर्चन्टस चेम्बर्सचं बंदमथ्ये सहभागी होण्याच आवाहन

एमपीसी न्यूज:  द पुना मर्चन्टस चेम्बरने रिटेल व्यापारी, ग्राहक व शेतकऱ्यांना जीएसटी विरोधातील बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. (Pune News) अन्नाधान्य खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5% जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतला आहे. याबातचे नोटिफिकेशन 13 जुलै ला काढले असून 18 जुलै पासून लागू होणार आहे. या बंदमध्ये फेडेरेशन ऑफ अससोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडही सहभागी होणार आहेत.

 

केंद्र सरकारने अन्नाधान्य, खाद्यान्न व जीवनवश्यक वस्तूंवर 5% जीएसटी आकरण्याचा निर्णय घेतल्यामुळे
त्याचा मोठा परिणाम व्यापारावर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. (Pune News) त्यामध्ये अन्नाधान्य, गूळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे. हा जीएसटी 18 जुलै पासून लागू होणार आहे. याबाबत प्रमुख संघटनांनी शनिवार 16 जुलैला देशव्यापी बंद पुकारला आहे. द पुना मर्चन्टस चेम्बर बरोबरच फेडेरेशन ऑफ अससोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड उद्याच्या जीएसटी विरोधातील बंद मध्ये सामील होणार आहे. फेडेरेशन ऑफ अससोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड ही पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग, व्यापार, व्यावसाय क्षेत्रातील 25 संस्थांची शिखर संघटना आहे.

फेडेरेशन ने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार औद्योगिक क्षेत्र ही निषेध नोंदवून या बंदला पाठिंबा देणार आहे. याबाबत तीव्र निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना दिले जाणार आहे. द पुना मर्चन्टस चेम्बरने आवाहन केले आहे की या बंदमध्ये रिटेल व्यापारी, ग्राहक व शेतकऱ्यांना सामील करावे व 16 जुलैचा हा बंद 100 % यशस्वी करावा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.