Pune News : महामानवाची समतेची शिकवण आजही आदर्श व प्रेरणादायी : राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

एमपीसी न्यूज : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला आजही आदर्श व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांनी आज स्टेशन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री कदम यांनी येथे उपस्थित असलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व कलाकारांबरोबर चर्चा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.