Pune News : कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक

एमपीसी न्यूज – कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेमुळे प्रभावित झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ अधिक आहे. जगभरातील आकडेवारी पाहिल्यास कोविड 19 ची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक आहे. या आजाराचा धोका व मृत्यू टाळण्यासाठी लसीकरण दहा वर्षे वयापर्यंत अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करणे आवश्यक असल्याचे मत कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. गणेश बाडगे यांनी व्यक्त केले आहे.

केंद्राचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांनी सांगितलेली कोविडची तिसरी लाट अपरिहार्य आहे. जर आपण तिसरी लाट आलेल्या देशांचा आढावा घेतल्यास त्यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. सध्याच्या लसीकरण कार्यक्रमात 18 ते 45 वयोगटातील तरूणांचा समावेश केला आहे. मात्र लोकसंख्येच्या 30 टक्के लोकसंख्या असलेल्या मुलांचा लसीकरणात समावेश झालेला नाही. त्यामुळे हा मोठा वर्ग असुरक्षित व धोकादायक स्थितीत आहे.

डॉ. गणेश बाडगे म्हणाले की, मुलांचे तिसर्‍या लाटेच्या संकटापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण कोविड -19 मधील मुलांना अधिक चांगले संरक्षण देऊ शकते. फाइजर-बायोटेक या अमेरिकेत लसीकरण करणार्‍या लशीचा डोस मुलांना दिला जात आहे. त्याचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. 12 ते 15 वर्षे वयोगटातील लशीने 100 टक्के कार्यक्षमता दर्शविली आहे. तर सहा महिने ते 11 वर्षे वयोगटातील मुलांच्या दुसर्‍या गटावरील अभ्यास मॉडर्ना तर्फे सुरू झाला आहे.

देशभरात पहिल्या लाटेत मुलांचे संक्रमित होण्याचे प्रमाण 1 टक्के होते. तर दुस-या लाटेत हेच प्रमाण 7 टक्के इतके वाढलेले आहे. पहिल्या लाटेत मुले प्रभावित होत होती, मात्र यावेळी यामध्ये मृत्यूचे प्रमाण लक्षणिय आहे. पुण्यातील मुलांची आकडेवारी देखील अशीच आहे. एकूण कोविड पॉझिटिव्ह केसांपैकी सुमारे ७07 ते 10% प्रमाण हे महाराष्ट्राचे आहे.

18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण होईपर्यंत घरातच रहावे, शाळा, परीक्षा टाळा आणि वृद्धापकाळातील ज्येष्ठांचा संपर्क टाळा. कारण ते कोविडचे सुपर फैलाव करणारे म्हणून काम करतील. मास्क घालण्याबरोबरच हाताची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर आवश्यक आहे. जर लक्षणे दिसत असल्यास तात्काळ चाचणी करा व स्वत:ला इतरांपासून वेगळे करा. मागील वर्षभराच्या काळात पालक त्यांच्या मुलांसाठी सुरक्षित निवार्‍याची व्यवस्था करण्यासाठी झटत आहेत. आपल्याकडे देखील अशाच प्रकारे लसीकरण सुरु केल्यास मोठ्या प्रमाणात मुलांचे संरक्षण करता येईल असेही बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना खेर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.