Corona virus test : अत्यावश्यक उपचारासाठी कोविड-19 ची आता ‘ट्रू नेट’ चाचणी 

एमपीसी न्यूज – कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी आता ‘ट्रू नेट’ चाचणी करण्यात येणार आहे. अ‍ँन्टीजेन चाचणीपेक्षा अधिक अचूक आणि तात्काळ अहवाल प्राप्त होणाऱ्या या चाचणीत तोंडातील थुंकीचे नमुने घेतले जातात.

सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी करून या चाचण्यांची तीन गटांमध्ये विभागणी केली आहे. राज्य शासनाने नुकतेच आदेश जारी केले आहेत. पहिल्या गटात ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे, अशांची अँटीजेन चाचणी करण्यात यावी.यामुळे रूग्णांच्या उपचारासाठी अर्ध्या तासात निर्णय घेता येतील.

दुसऱ्या गटात ‘ट्रू नेट’चाचणी करण्यात यावी. त्यामध्ये उपचारापूर्वी मृत्यू झालेला रूग्ण, बाळतंपणासाठी आलेल्या माता, तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या व तत्सम व्यक्तींची कोविड-19 ची तपासणी करावी.

तिसऱ्या गटात ‘आरटीपीसीआर’ चाचणी ही अ‍ँन्टीजेन चाचणीही निगेटिव्ह आलेल्या आणि  लक्षणे असलेल्या रूग्णांची, पॉझिटिव्ह व्यक्तींच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व परदेशातून येणाया व्यक्तींची करण्यात यावी, असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.