Pune News : चांगले काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी जेवायला जाणार ; राज ठाकरे यांची घोषणा

प्रत्येक महिन्याला राज ठाकरे यांचा पुणे दौरा

एमपीसीन्यूज : पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. मनसेचा जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी आपण स्वत: जेवायलाय जाणार आहोत, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यामुळे मनसे शाखा अध्यक्षांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक नंतर तीन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुणे शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत.

या बैठकदरम्यान त्यांनी आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. मनसेचा जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी आपण स्वत: जेवायलाय जाणार आहोत, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यामुळे मनसे शाखा अध्यक्षांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.

प्रत्येक महिन्याला राज ठाकरे यांचा पुणे दौरा

तसेच प्रभाग अध्यक्ष ही नेमणूक रद्द करून, शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक केली जाणार आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला तीन दिवस पुण्यात येऊन राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणार घेणार असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.